लंडन : चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ब्रिटनमधल्या जनमत चाचणीनंतर मोठी राजकीय उलथा-पालथ दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये डेव्हिड कॅमरून पद सोडणार आहेत. जनमत चाचणीचा कौल कॅमरून यांच्या विरोधात गेल्याने त्यांनी हा निर्णय घेतलाय. ब्रिटनमधील नागरिकांनी महासंघातून बाहेर पडावे (ब्रेक्झिट) याच बाजूने कौल दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमधील आघाडीचे माध्यम ‘बीबीसी’ने ब्रेक्झिटच्या बाजूनेच कौल असल्याचे जाहीर केले आहे. बाहेर पडावे या बाजूने ५१.८९ टक्के जणांनी मतदान केले. तर ४८.११ टक्के मतदारांनी युरोपिय महासंघात राहण्याच्या बाजूने मत टाकले.


आतापर्यंत मोजण्यात आलेल्या मतांपैकी १ कोटी ५९ लाख मतदारांनी बाहेर पडावे, या बाजूने मतदान केले असल्याचे जाहीर झाले असून, एक कोटी ४८ लाख मतदारांनी युरोपिय महासंघात राहण्याचे बाजूने पसंती दिली आहे. ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आता त्याचे राजकीय पडसाद दिसायला लागलेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी आपलं पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये कॅमरून पंतप्रधानपद सोडणार आहेत. ब्रिटन युरोपियन युनियनमध्येच राहवा असं कॅमरून यांचं मत होतं. त्याच्या विरोधात जनमत चाचणीनं कॅमरून यांनी हा निर्णय घेतला आहे. 


गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिली. त्यामुळे आता युरोपियन युनियनमधल्या राष्ट्रांची संख्या २८ वरून २७ होणार हे जवळपास निश्चित झालंय. ब्रिटीश जनतेनं घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातल्या शेअर आणि चलन बाजारात मोठी पडझड बघयाला मिळत आहे.


भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स १००० अंकांनी आपटलाय. तर निफ्टीही तीनशेहून अधिक अंकांनी कोसळलाय.  २००८च्या मंदीतून ब्रिटीश अर्थव्यवस्था सरावरलेली नसताना आलेल्या या निकालामुळे ब्रिटीश चलन असेला स्टर्लिंग पाऊंडसुद्धा तीस वर्षातल्या नीचांकी स्तरावर आलाय. 


भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी घसरल्यानं एका डॉलरचा भाव ६८ रुपये २० पैसे झालाय. रुपयात अचानक आलेली ही घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप केल्याची माहिती पीटीआयनं दिलीय. एकूण जगभरातल्या बाजारात मोठा भूकंप आलाय.