वॉशिंग्टन : नेहमीच सांगितले जाते की, चीनकडून भारताला धोका आहे. चीनने नेपाळला आपल्याकडे वळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यश आले. आता तर भारतीय सीमेजवळ आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनने भारतीय सीमेवरील संरक्षण सज्जता आणि लष्करी बळात मोठ्याप्रमाणावर वाढ करण्यात आली आहे, असे पेंटागॉनने म्हटलेय. जगभरात ज्याठिकाणी चीनी लष्कराचे तळ आहेत त्याठिकाणी सैन्याच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून चीनी सैन्याच्या पाकिस्तानमधील लष्करी तळाचा समावेश आहे. 


चीनच्या लष्करी आणि संरक्षण बाबींविषयी अमेरिकन काँग्रेसपुढे सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात याचा खास उल्लेख करण्यात आलाय. ‘आता पाकिस्तानला आवरण्याची वेळ’  अमेरिकेच्या पूर्व आशियाई संरक्षण विभागाचे उप सहाय्यक सचिव अब्राहम डेन्मार्क यांच्या माहितीनुसार, भारताच्या सीमेनजीक चीनकडून संरक्षण व्यवस्था आणि लष्करी संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.


हे सैन्य वाढविण्यामागे चीनचा नेमका हेतू काय आहे हे समजलेले नाही, असे अब्राहम यांनी म्हटलेय. याशिवाय, चीनकडून तिबेटमधील लष्करी व्यवस्थेत करण्यात येणाऱ्या बदलांविषयी विचारण्यात आले असता, या लष्करी हालचाली अंतर्गत स्थैर्यासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे, हे सांगणे कठीण असल्याचे अब्राहम यांनी सांगितले. 


अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅश्टन कार्टर यांच्या भारत दौऱ्याचाही उल्लेख केलाय. ही भेट दोन्ही देशांसाठी खूप सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही भारताबरोबरचे संबंध आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. भारताचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळेच ही भेट आहे, असे ते म्हणालेत.