नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रंप 'अमेरिका फर्स्ट' म्हणत मुक्त बाजार व्यवस्थेला नियंत्रित करणार असल्याचं म्हणत आहेत. पण जगभरातील इतर देश यांच्याविरोधात आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्र देखील चिंतेत आहे. ट्रंप यांचा आरोप आहे की, जर्मनी आणि जपान परराष्ट्र मुद्रा विनिमय बाजाराला प्रभावित करत त्यांच्या हिताचा व्यापार करत आहेत. ट्रंप यांच्या या वक्तव्याविरोधात जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि जर्मनीचे चान्सलर एंजेला मर्केल एकसोबत आले आहेत.


यूरोपियन काउंसिलमध्ये परराष्ट्र संबंध विभागाचे अधिकारी मार्क लेनर्द यांचं म्हणणं आहे की, ट्रंप यांच्यासोबत एक मोठा वाद निर्माण तयार होणार आहे. ट्रंप त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट'चा अजेंटा पुढे नेण्यासाठी चीन आणि इतर देशांसोबत कोणतीही गरज नसतांना त्यांना उकसवण्याचं काम करत आहेत.


ट्रंप आता बहुपक्षीय करारा ऐवजी द्विपक्षीय करार यावर अधिक लक्ष देणार आहेत. त्यामुळे इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आता काय भूमिका घ्यावी आणि वेगळा समुह तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


ट्रंप यांनी मेक्सिकोला सांगून टाकलं आहे की, त्यांच्याशी सलग्न सीमावरुन अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना थांबवण्यासाठी तेथे भिंत बांधणार आहेत. मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तूंवर अधिक आयात कर लावून त्यांच्याकडूनच भिंत उभारण्याचा खर्च वसूल केला जाणार आहे. ट्रंप यांना सध्या कोणताही देश हलक्यात घेण्याच्या विचारात नाही आहे.