चीनची अर्थव्यवस्था डबघाईला, आर्थिक मंदीच्या फेऱ्यात
एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत शंभर अब्ज डॉलरनं कमी झालीय.
बीजिंग : एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत शंभर अब्ज डॉलरनं कमी झालीय.
परकीय गंगाजळी इतक्या मोठ्या प्रमाणावर आटण्याचा प्रकार २०१२ नंतर पहिल्यांदाच घडलाय. त्यामुळं चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडू लागल्याचं समोर येतंय. युआनला सावरण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर डॉलर विक्री केल्याचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत.