बीजिंग : एखादा कोट्याधीश व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर भीक मागताना दिसला तर... नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं घडतंय हे मात्र खरं... चीनच्या रस्त्यांवर एक कोट्याधीश भीकारी दिसतोय. कोट्याधीश असताना तो का भीक मागतोय? असा साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल... तर, या श्रीमंत व्यक्तीचा मूळचा धंदाच 'भीक मागणं' हा आहे. भीकेतूनच तो महिन्याकाठी भरघोस कमाईही करतो. 


बीजिंगमध्ये खाजगी इमारत


रस्त्यावर बसून भीक मागून त्यानं चीनच्या राजधानीत म्हणजेच बीजिंगमध्ये स्वत:ची एक इमारतही उभी केली आहे. 


पैसे मोजणाऱ्यांना देतो टीप


इतकंच नाही... तर तो दर महिन्याला आपल्याकडे साठलेले पैसे पोस्ट ऑफीसमध्ये जमा करतो... यासाठी तो साठलेले सगळे पैसे पोस्ट ऑफिससमोर असलेल्या फरशीवर टाकतो... आणि पैसे मोजण्यासाठी मदत करणाऱ्यांना तो मोठी टीपही देतो.