पहिल्याच बजेटमध्ये ट्रम्प यांचा पाकिस्तानला दणका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच बजेटमध्ये परकीय मदतीला मोठी कात्री लावण्यात आली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच बजेटमध्ये परकीय मदतीला मोठी कात्री लावण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इस्त्रायल, इजिप्त यासह अन्य काही देशांना अमेरिका आर्थिक मदत करते. यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली असते. या निधीमध्ये ट्रम्प यांनी तब्बल 28 टक्क्यांची कपात सुचवलीये. याचा पाकिस्तानला सर्वात मोठा फटका बसणार असल्याचं मानलं जातंय.
पाकिस्तानला केली जाणारी मदत ही थेट अतिरेक्यांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप सातत्यानं होत असतो. आता बजेटमधल्या तरतुदीमध्येच मोठी कपात झाल्यामुळे पाकिस्तानकडे वाहणारा डॉलर्सचा प्रवाह आटणार आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या अर्थसंकल्पात संरक्षणाची तरतूद तब्बल 54 अब्ज डॉलर्सनी वाढवण्यात आलीये. आगामी काळात आयसिसविरोधी कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू होण्याचे हे संकेत आहेत.