वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिझनेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण लक्ष हे अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प ऑर्गनाइजेशनचं काय होणार याबाबत त्यांनी मात्र काही सांगितलं नाही. असं म्हटलं जातंय की, ट्रम्प त्यांच्या मुलांना बिझनेस सोपणार आहेत. पण अजून हे निश्चित नाही की केव्हा आणि कसे.


ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, "१५ डिसेंबरला न्यूयॉर्कमध्ये एका मोठ्या प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान मुलांसोबत उपस्थित राहणार आहे. बिझनेस सोडण्यावर चर्चा करणार आहे. कायद्यानुसार माझ्यासाठी असं करणं बंधनकारक नाही आहे पण एक राष्ट्राध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की हे गरजेचं आहे. बिझनेसवरुन काही विवाद नाही झाला पाहिजे.


कायदेशीर कागदपत्र तयार होत आहेत. जे मला पूर्णपणे बिझनेसपासून वेगळे करणार आहेत. राष्ट्राध्यक्ष बिझनेस पेक्षा अधिक महत्त्वाचं काम आहे.


बिझनेसमन, टीव्ही पर्सनॅलिटी आणि राजकारणी ट्रम्प यांचा व्यापार 30, 263 कोटीहून अधिकचा आहे. ट्रम्प ऑर्गनाइजेशनचा बिझनेस पनामा सिटीपासून इस्तांबूलपर्यंत पसरला आहे.