...जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पुतीन यांना धावत्या बसखाली ढकलतात!
मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक वादग्रस्त उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नवीन वाद उभा केला आहे
मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक वादग्रस्त उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान नवीन वाद उभा केला आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यावर आसूड उगवतानाच त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावरही टीका केली आहे.
याला जबाबदार आहे ती त्यांची नवी जाहिरात. या जाहिरातीक डोनाल्ड ट्रम्प हे व्लादिमीर पुतीन यांना एका शाळेच्या बसखाली ढकलत असल्याचं दाखवलं आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात गेल्या काही काळात वाढत असलेल्या वादाचा संदर्भ या जाहिरातीला आहे.
तसेच अमेरिकेच्या विरोधकांना हिलरी क्लिंटन उत्तर देताना कुत्र्याप्रमाणे भुंकताना दाखवलं आहे. या जाहिरातीवर रशियन सरकारने मात्र आक्षेप घेतला आहे. 'रशियाचे दानवीकरण करणे हाच अमेरिकी प्रचारकांचा एकमेव उद्देश उरला असल्याचे' रशियाने म्हटले आहे.
ट्रम्प समर्थकांना ही जाहिरात आवडली असली तरी जगभरातून मात्र त्यांच्यावर टीका होत आहे.