जोडप्याचे ते हनिमून क्षण ड्राईव्हरने चोरून केले शूट
हनिमूनसाठी गेलेल्या एका भारतीय जोडप्याच्या लैंगिक संबंधांचे मोबाईलवर चोरुन शुटींग करतांना पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. विवाहानंतर हनिमूनसाठी हे जोडपे दुबईला आले होते.
दुबई : हनिमूनसाठी गेलेल्या एका भारतीय जोडप्याच्या लैंगिक संबंधांचे मोबाईलवर चोरुन शुटींग करतांना पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. विवाहानंतर हनिमूनसाठी हे जोडपे दुबईला आले होते.
गाडीमधील देखील काही क्षण या ड्राईव्हरने शूट केले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पतीच्या व्हॉटसअॅपवर तो व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडे दोन हजार दिरामची मागणी केली.
पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. याबाबतची माहिती या व्यक्तीने त्याच्या दुबईमधील मित्राला दिली यानंतर दोघांनी याबाबतची पोलिसात तक्रार केली. दोन दिवसांनी जेव्हा ड्रायव्हर पैशांसाठी हॉटेलमध्ये आला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.