नग्न व्हिडीओ काढला; ३७० कोटींची भरपाई
मायकल डेव्हिड बॅरेटने तिचा नग्न व्हिडीओ काढला.
न्यू यॉर्क : अमरिकेची स्पोर्टस रिपोर्टर इरिन अँड्र्यूजचा एका व्हिडीओत नग्न व्हिडीओ काढण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने साडेपाचशे कोटी डॉलर, म्हणजेच जवळ-जवळ ३७० कोटी रूपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अँड्र्यूज ३७ वर्षांची असून, ती फॉक्स स्पोर्टसची रिपोर्टर आहे.
हॉटेलमध्ये नग्न व्हिडीओ काढला
नॅशनल हॉटेलमध्ये २००८ साली मायकल डेव्हिड बॅरेटने तिचा नग्न व्हिडीओ काढला होता, त्यानंतर त्याने तो इंटरनेटवर अपलोड केला, या प्रकरणी अँड्र्यूजने दोन कंपन्या आणि बॅरेट विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.
पैसे कमावण्यासाठी
शिकागोमधील एका विमा कंपनीच्या मॅनेजरने ही मान्य केलं आहे की, महिला स्पोर्टस रिपोर्टर अँड्र्यूजवर आपण निशाणा साधला होता. पैसे कमावण्यासाठी आपण असं केलं, असंही त्याने म्हटलं आहे.
व्हिडीओ ऑनलाईन अपलोड
जेव्हा वेबसाईट टीएमझेडने या व्हिडीओसाठी बॅरेटला पैसे देण्यास नकार दिला. तरीही बॅरेटने हा व्हिडीओ ऑनलाईन अपलोड केला.
दाराच्या छेदातून नग्न व्हिडीओ
बॅरेटने अँड्र्यूजचा पाठलागही केला, त्या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलंय, बॅरेटने हॉटेलच्या दाराला असलेल्या छेदातून अॅड्र्यूजचा नग्न व्हिडीओ बनवला होता. बॅरेटला अडीच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मी एवढी घाबरली होती की,
अँड्र्यूजने न्यायालयाला सांगितलं, या घटनेमुळे मी एवढी घाबरली होती की, हॉटेलच्या एसी आणि चेंजिंग रूममध्ये रेकॉर्डिंग होईल या भीतीने मी नेहमी छुपे कॅमेरे शोधत होती.
अपमान, दुखावलेला स्वाभिमान, लाज
न्यायालयात हा प्रसंग सांगताना ती खूप रडत होती, व्हिडीओ बनवल्याने मला अपमान झाल्यासारखं, स्वाभिमान दुखावल्यासारखं आणि लाज येणारं हे सर्व वाटतं असं तिने म्हटलंय.
जीवनातील सर्वात वाईट प्रसंग
प्रसिद्ध होण्यासाठी तिने हा व्हिडीओ स्वत: काढला असा आरोप तिच्यावर झाला, त्यावर ती रडत म्हणाली, हा माझ्या जीवनातील सर्वात वाईट प्रसंग होता. तर बॅरेटने असं म्हटलंय की मी व्हिडीओ यासाठी काढला, की अँड्र्यूज लोकप्रिय होती.