लंडन : इंग्लंडमध्ये मतमोजणी सुरु झाले आहे. रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनमध्ये रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी हे मतदान झाले. दरम्यान, युरोपियन युनियनचा विरोध करणारा लिव्ह कॅम्प सध्या आघाडीवर आहे. 
 
लिव्ह कॅम्प ६५ हजार मतांनी पुढे आहे. सडरलँडमध्ये लिव्ह कॅम्पने मोठा विजय मिळवला. प्रारंभीच्या टप्यामध्ये रिमेन कॅम्पने आघाडी घेतली होती. मात्र आता लिव्ह कॅम्प पुढे आहे. नेमके चित्र स्पष्ट व्हायला काही वेळ लागेल.
 
दक्षिण इंग्लंडमध्ये मुसळधार पावसामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा आला. यूकेमध्ये विविध केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. यूगव्हने मतदानाच्या दिवशी पाच हजार मतदारांचा ऑनलाइन सर्व्हे केला. त्यात ५२ टक्के मतदारांनी युरोपियन युनियनच्या बाजूने तर, ४८ टक्क्यांनी बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिल्याचा यू गव्हने दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युकेच्या जनतेने बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला तर तो २८ देशांच्या युरोपियन युनियनसाठी मोठा धक्का असेल. एकूण ४ कोटी ६४ लाख ९९ हजार ५३७ जणांना मतदानाचा अधिकार होता.


ठळक घडामोडी :
 
- लिव्ह कॅम्पच्या आघाडीमुळे अनेकांची धास्ती वाढली, विविध शेअर बाजारातून नकारात्मक संकेत.
- स्कॉटलंडमध्ये रिमेन कॅम्प विजयी.
- वेल्समध्ये लिव्ह कॅम्प विजयी.
- ऑक्सफोर्डचा कौल युरोपियन युनियनमध्ये रहाण्याच्या बाजूने, रिमेनच्या बाजूने ४९४२४ मते, लिव्हच्या बाजूने २०,९१३ मते.
- स्वानसी, ब्युरी, हार्लो, एडन, क्लेवलँड, डेनबिगशायरमध्ये लिव्ह कॅम्प विजयी.
- हार्टलेपूल, स्टॉकटॉन, मरथायर, बासिलडॉन, रॉचफॉर्डमध्ये लिव्ह कॅम्प विजयी.
- साऊथ टायनीसाईड, लगान व्हॅली, नॉर्थ अंट्रीममध्ये लिव्ह कॅम्प विजयी.
- शेठ आइसलँड, पश्चिम डनबारटॉनशायर, डनडी सिटी, पश्चिम टायरोने, इलिन सायर,ईस्ट आयरशायरमध्ये रिमेन कॅम्प विजयी.
- केटीरींगमध्ये लिव्ह कॅम्प विजयी.
- स्विनडॉन आणि ब्रॉक्सबाउर्नमध्ये लिव्ह कॅम्प विजयी.
- इसलेस ऑफ स्किलीमध्ये रिमेन कॅम्प विजयी.
- फॉयलेमध्ये रिमेन कॅम्प विजयी.
- गिब्राल्टर, न्यूकॅसले, ऑरकने आइसलँड, क्लाकमानन शायरमध्ये युरोपियन युनियनचे समर्थन करणारी रिमेन कॅम्प विजयी फक्त संडरलँडमध्ये लिव्ह कॅम्प विजयी.
- ब्रेक्झिट - रिमेन कॅम्प तीन भागांमध्ये विजयी, २३ हजार मतांनी आघाडीवर.
- इंग्लंडमध्ये मतमोजणी सुरु.
- मतदान संपल्यानंतर लगेच यू गव्ह मतदानोत्तर सर्वेक्षण चाचणीत रिमेनला चार टक्क्यांची आघाडी, म्हणजे इंग्लंड युरोपियन युनियनमध्येच राहील असा अंदाज, रिमेनच्या बाजूने ५८ तर, लिव्हच्या बाजूने ४८ टक्के मतदार.
- युरोपियन युनियनमध्ये रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी इंग्लंडमध्ये सुरु असलेले मतदान संपले