लंडनमधल्या हल्ल्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये संतापाची भावना
लंडनमधल्या हल्ल्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये संतापाची भावना आहे. अतिरेकी हल्ल्याचा कायमच धोका असलेली फ्रान्सची राजधानी पॅरीसचा जगप्रसिद्ध आयफेल टॉवर रात्री 12 वाजता अंधारात बुडला. लंडन हल्ल्याचा निषेध करण्यासाठी टॉवरवर ब्लॅकआऊट करण्यात आलं.
लंडन : लंडनमधल्या हल्ल्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये संतापाची भावना आहे. अतिरेकी हल्ल्याचा कायमच धोका असलेली फ्रान्सची राजधानी पॅरीसचा जगप्रसिद्ध आयफेल टॉवर रात्री 12 वाजता अंधारात बुडला. लंडन हल्ल्याचा निषेध करण्यासाठी टॉवरवर ब्लॅकआऊट करण्यात आलं.
तर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स, जर्मनीची राजधानी बर्लीन इथं सरकारची कार्यालयं आणि संसदभवनांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीये. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये संसदपटूंनी 1 मिनिट शांतता पाळून लंडन हल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. इटलीची राजधानी रोममध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.