इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सुफी दर्ग्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान 30 जण ठार, तर 100पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. शेहवान शहरात सुफी लाल शहाबाझ कलंदर दर्ग्यामध्ये आत्मघातकी हल्लेखोरानं हा स्फोट घडवून आणला.


'धामाल' नावाची सूफी प्रथा सुरू असतानाच हा हल्ला करण्यात आला. 'धामाल'साठी दर्ग्यामध्ये शेकडो भाविक जमले होते. या दर्ग्याच्या जवळपास एकही रुग्णालय नसल्यामुळे जखमींवर उपचार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. सगळ्यात जवळचं रुग्णालय 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. रुग्णवाहिकांची संख्याही तुटपुंजी असल्यामुळे मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.