मनिला : फिलिपिन्सजवळ एका मच्छीमाराला सुमारे दहा वर्षांपूर्वी असा मोटी मिळाला जो जगातील सर्वात मोठा आणि  सर्वाधिक किंमतीचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, मच्छीमाराला सुमारे दहा वर्षापूर्वी टाकलेल्या जाळीमध्ये तब्बल ३४ किलोचा कोट्यवधी रुपयांचा मोती सापडला होता. मच्छीमाराने या अनमोल मोतीला आपल्या पलंगाखाली लपवून ठेवले होते. 


कोट्यवधीची संपत्ती असूनही हा मच्छीमाराने गरिबीत जगत होता. त्याला माहितीच नव्हते की हा मोती इतका अनमोल आहे. हा व्यक्ती गुडलक समजून आपल्या बिछान्याखाली ठेवत होता.  


यानंतर मच्छीमाराच्या घराला आग लागल्यानंतर त्याने हा मोती एका पर्यटन अधिकाऱ्याच्या हाती दिला, तेव्हा तो दंग झाला.  नंतर मच्छीमाराला कळाले की हा जगातील सर्वात मोठा मोती आहे. त्याची किंमत सुमारे ६७० कोटी आहे. हे कळाल्यावर त्याला काय करावे समजत नव्हते. 


मच्छीमाराने सांगितले की दहा वर्षापूर्वी पालावान द्विपावर समुद्राजवळ हा मोती सापडला. २००६मध्ये एकदिवस समुद्रकिनारी नाव खोलत असताना खाली काही तरी दिसले. त्याने पाहिले की लंगरच्या खाली एक विशालकाय मोती लटकला होता.


त्याचे वजन ३४ किलो आणि तो २६ इंच लांब आहे. फिलिपिन्सच्या समुद्रात सापडलेल्या या विशाल मोतीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटी डॉलर (६७० कोटी ) असते. हा मोती ६.४ किलोच्या पर्ल ऑफ अल्लाह पेक्षा अनेक पट मोठा आहे. पर्ल ऑफ अल्लाह या मोतीला आतापर्यंत जगातील सर्वात मोठा मोती मानले जात होते. त्याची किंमत ४ कोटी डॉलर (२६० कोटी रुपये) आहे.