नवी दिल्ली : रशिया आणि युरोपीयन संसदेनं भारतानं पाकिस्तानवर केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं समर्थन केलं... यानंतर आता आणखी एका देशाचं नाव या यादीत जोडलं गेलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियानंतर आता जर्मनीनंही भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं समर्थनचं केलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाशी निपटण्याचे दोन कायदे आहेत, असं भारतातील जर्मनीचे राजदूत मार्टिन यांनी म्हटलंय. 


'पहिला कायदा हा की, प्रत्येक देशानं आपल्या देशात दहशतवादाला थारा मिळू न देण्याचं सुनिश्चित करायला हवं... आणि दुसरा म्हणजे, वैश्विक दहशतवादापासून आपली सुरक्षा करण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे' असं मार्टिन यांनी म्हटलंय. 


जेव्हा दहशतवादाचा प्रश्न असेल तेव्हा जर्मनी आपल्या प्रतिस्पर्ध्यासोबतही खांद्याला खांदा लावून उभा राहतो, असंही मार्टिन यांनी म्हटलंय. ही केवळ व्यर्थ बडबड नाही तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मन चान्सलर एन्जेला मर्केल यांनी हस्ताक्षर केलेल्या राजनैतिक घोषणा पत्रात हे याअगोदरच स्पष्ट केलं आहे.


सीमेपलिकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांना पाणी पाजण्याच्या भारताच्या कारवाईला आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थनच मिळताना दिसतंय.