बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी तिने चालत्या ट्रेनमधून घेतली उडी
प्रेमात पडल्यावर माणूस काय करेल काही सांगता येत नाही. चीनमधील अन्हुईमध्येही असंच काहीसं घडलं.
बीजिंग : प्रेमात पडल्यावर माणूस काय करेल काही सांगता येत नाही. चीनमधील अन्हुईमध्येही असंच काहीसं घडलं.
बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी चक्क शांघायमध्ये तिने चालत्या ट्रेनमधूनच उडी घेतली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवली आणि मुलीचा जीव वाचवण्यात यश मिळाले.
या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले.