वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत असलेले  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपल्या बेताल वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत येत असतात. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक नवीन  ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BabesForTrump नावाने सुरू करण्यात आलेल्या या ट्विटर अकाउंटवर अर्धनग्न होऊन तरुणी ट्रम्पचा प्रचार करत आहेत. महाविद्यालयीन तरुणींचा ट्रम्प यांना पाठिंबा आहे म्हणून कमी कपडे घालण्यात त्यांना काहीच हरकत नाही. असं एका प्रचारकाने सांगितलं आहे. 


महिलांवर वक्तव्य करून वादात राहणारे ट्रम्प यांना महिलांकडून असा पाठिंबा मिळणे नवलंच आहे. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार या फंडा किती काम करुन जाईल हे निकालानंतरच समोर येईल. पण सध्या अशा फोटोमुळे मात्र ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.