नवी दिल्ली : भारत पाकिस्तान दरम्यान युद्धाची चिन्हं दिसू लागलीत. पारंपरिक शत्रू असलेल्या उभयदेशांत केव्हाही न्यूक्लिअर युद्ध छेडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या दोन्ही देशांत न्यूक्लिअर युद्ध झालंच तर...


'इंडियास्पेंड'चा अहवाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियास्पेंड'च्या अहवालानुसार, भारत - पाकिस्तानात न्यूक्लिअर युद्ध झालंच तर जवळपास 2 करोडोंहून अधिक लोकांचा यात नाहक बळी जाऊ शकतो. 


इतकंच नाही तर संपूर्ण जगभरातला अर्धा ओझोन वायूही संपुष्टात येऊ शकतो. जगभरातील मान्सूनवरही याचा परिणाम दिसून येईल... अनेक पिकांचं नुकसान होऊ शकतं.


जगाला भोगावी लागणार शिक्षा...


2007 मध्ये यूएस यूनिव्हर्सिटीनं एक अभ्यास सादर केला होता. यामध्ये दोन्ही देशांच्या एका न्यूक्लिअर हत्याराचं वजन जपानमधल्या हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या बॉम्बसारखंच म्हणजे 15 किलो टन आहे. 


जर न्यूक्लिअर युद्ध झालं तर 2015 पर्यंत जेवढ्या लोकांना दहशतवादामुळे जीव गमवावा लागलाय त्यापेक्षा 2221 पटीनं जास्त लोकांना आपला प्राण गमवावा लागेल. 


उपलब्ध माहितीनुसार, पाकिस्तानकडे जवळपास 110 ते 130 न्यूक्लिअर हत्यारं आहेत. तर भारताकडे 110  ते 120 न्यूक्लिअर हत्यारं आहेत.