मुंबई : तुम्हाला माहित आहे गुगलचा सीईओ सुंदर पिचई यांचा २०१५ या सालातील पगार किती आहे? मागील वर्षात सुंदर पिचई यांनी १०.०५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ६६६ कोटी रुपये कमावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिचई यांनी जे इन्कम रिटर्न फाईल केलं आहे त्यानुसार पिचईला ६.५२ लाख डॉलर पगार, ९९८ लाख डॉलरचे स्टॉक आणि इतर २२,९३५ डॉलरची कमाई केली आहे. 


गुगलने रेस्ट्रिक्टेड स्टॉकमधून १९.९० कोटी डॉलर पिचई यांना दिले. गुगलने दिलेल्या कोणत्याही सीईओला दिलेल्या कमाईमध्ये पिचई यांची कमाई सर्वाधिक आहे. 


भारतीय वंशाचे पिचई २०१५ मध्ये गुगलचे सीईओ झाले होते. या आधी ते क्रोम आणि अँड्रॉईड ऑपरेशन बघायचे.