अमेरिकेत स्थायिक होणं झालं महाग
अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. अमेरिकेत ईबी-5 म्हणजेच गुंतवणुकीसाठी वीजा घेऊन जाणे आता भारतीयांसाठी महाग झालं आहे. याआधी ईबी-5 वीजाच्या नियमानुसार कमीत कमी 6.8 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागत होते. पण आता याची मर्यादा 12.2 कोटी झाली आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. अमेरिकेत ईबी-5 म्हणजेच गुंतवणुकीसाठी वीजा घेऊन जाणे आता भारतीयांसाठी महाग झालं आहे. याआधी ईबी-5 वीजाच्या नियमानुसार कमीत कमी 6.8 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागत होते. पण आता याची मर्यादा 12.2 कोटी झाली आहे.
कमीत कमी 9.2 कोटींची गुंतवणूक
सध्या नियमानुसार कमी रोजगार असणाऱ्या ग्रामीण भागात 5 लाख गुंतवणूक करावे लागतात. पण याची मर्यादा आता वाढवली आहे. आता कमीत कमी 9.2 कोटी रुपये जमा करावे लागतील. अमेरिकेच्या होमलँड सुरक्षा विभागाने 17 जानेवारीला याबाबत संशोधन केलं.
कसा मिळतो ईबी-5 वीजा
ईबी-5 ला रोख रक्कम देखील बोलतात. जर भारतीय व्यक्तीला अमेरिकेत एखादं घर हव असेल तर त्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणूकीतून कमीत कमी 10 अमेरिकन व्यक्तींना नोकरी मिळाली पाहिजे. या गुंतवणुकीसोबत एक व्यक्ती त्याची पत्नी आणि 21 वर्षापेक्षा कमी मुलासोबत अमेरिकेत घर घेऊ शकतो.