मिशिगन : हृदयाशिवाय कधी कुणी जगू शकेल का...? असा विचारही आपण करू शकत नाही. पण स्टेन लार्किन एक नाही दोन नाही तर तब्बल ५५५ दिवस हृदयाशिवाय राहिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचं हृदय धडधडत नसेल, तर तुम्ही जिवंतच राहू शकणार नाही... खरं ना? पण अमेरिकेत मिशिगनमध्ये राहणाऱ्या स्टेन लार्किन यांनी हे खोटं ठरवलंय... 


कृत्रिम हृदयाचा आधार


शरिरात हृदय नसताना स्टेन जिवंत राहिले... एक दोन नव्हे जवळजवळ दोन वर्षं... कृत्रिम हृदयाच्या आधारे तबब्ल ५५५ दिवस सामान्य आयुष्य जगत होते. त्यांच्या कृत्रिम हृदयापर्यंत रक्तपुरवठा होऊ शकेल, असं एक खास उपकरण तयार करण्यात आलं होतं... मॅच होणारं हृदय मिळेपर्यंत याच कृत्रिम हृदयाच्या आधारे स्टेन जगले...


बास्केटबॉलही खेळले...


लार्किन कुटुंबामध्ये हृदयविकार अनुवंशिक आहे... स्टेन यांच्या मोठ्या भावालाही कृत्रिम हृदय बसवावं लागलं होतं. गेल्याच वर्षी त्यांची हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली. आता ते निरोगी आयुष्य जगतायत. त्यानंतर स्टेन यांनाही कृत्रिम हृदय बसवावं लागलं... त्याचं चलनवलन नीट व्हावं, यासाठी सिनकार्डिया पोर्टेबल ड्रायव्हर हे बॅकपॅक उपकरण लावण्यात आलं. १३.५ पाऊंड वजनाचं हे यंत्र थेट त्यांच्या हृदयाशी जोडलं गेलं होतं. अशा कृत्रिम हृदयासह स्टेन सामान्य आयुष्य जगत होते... इतकंच काय, तर ते  बास्केटबॉलही खेळले होते हे ऐकून खुद्द डॉक्टरांनाही धक्का बसला.


एकट्या अमेरिकेत ५७ लाख हृदयाच्या प्रतिक्षेत 


अखेर ९ मे रोजी स्टेनना हृदयदाता मिळाला आणि त्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. एकट्या अमेरिकेत तब्बल १ लाख २१ हजार लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असल्याचं आकडेवारी सांगते. केवळ नव्या हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आहे तब्बल ५७ लाख... अवयव उपलब्ध न झाल्यामुळे दररोज सरासरी २२ लोकांना प्राण गमवावं लागतात. 


स्टेन आता एकदम तंदुरुस्त आहेत... यात जितकं विज्ञानाचं योगदान आहे, तितकंच त्यांच्या जगण्याच्या इच्छाशक्तीचं... आयुष्याला कंटाळलेल्या लोकांनी स्टेन यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवं.