नवी दिल्ली : आज कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचेचे भारताने दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयानेही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज कुलभूषण यांच्याबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षकारांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात ऐकली जाईल. नेदरलँडच्या हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयीन सुनावणीची लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय जाधवप्रकरणी निर्णय देणार आहे.


वरिष्ठ वकील हरीश सालवे याप्रकरणी भारताची बाजू मांडणार आहेत. या स्थगितीमुळे भारत आणि पाकिस्तान 18 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात समोरासमोर आले आहेत. 18 वर्षांपूर्वी पाक नौदलाच्या ताफ्यातील एक विमान भारतानं पाडल्याचा आरोप करत पाकने भारताविरूद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र त्यावेळी न्यायालयाने पाकिस्तानची मागणी धुडकावून लावली होती.