वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भारतीय निवडणुकीसारखीच एक समानता आहे, ती म्हणजे हायवोल्टेज ड्रामा. सरत्या दिवसागणिक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारातून तेच ठळकपणे दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीसाठीची हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातली चुरस कमालीची वाढली आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ओहोयो आणि पेन्सिलवेनिया प्रचार केला. तर दोघेही शनिवारी प्रचारासाठी फ्लोरिडात होते. ही तीन ठिकाणं त्यांच्या विजयात निर्णायक भूमिका वठवणार आहेत. 


निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात दोघांनी एकमेकांवर जहरी शाब्दिक हल्लाबोल केला. निवडणूक रॅलीत दोघेही तोंडसूख घेत असतानाच, सोशल मीडियावरही त्यांच्यातलं ऑनलाईन युद्ध सुरु होतं. या अत्यंत हायप्रोफाईल निवडणूक प्रचार आणि निकालाकडे जगाचं लक्ष लागलं आहे. तर अल कायदा या दहशतवादी संघटनेवर अमेरिकी सुरक्षा यंत्रणा बारीक नजर ठेऊन आहे. 


मतदानाच्या आदल्या रात्री हिलरी न्यूयॉर्कमधल्या जाविट्स सेंटरमध्ये, तर ट्रम्प न्यूयॉर्कमधल्याच हिल्टन मिडटाऊनमध्ये थांबणार आहेत. त्यामुळे तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे.