दिल्ली : काय, म्हशींचा इंटरव्ह्यू? कसं शक्य आहे हे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... पण, पाकिस्तानी टीव्हीवर तर अनेकांना पाहायला मिळालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पत्रकारानं आपल्या रिपोर्टची पुष्टी करताना चक्क म्हशींची 'मूक' संमती घेतली... आपल्या म्हणण्याला म्हशींचा पाठिंबा आहे, त्यांच्या तोंडातली वाक्यच आपण म्हणतोय, असा दावाही त्यानं चक्क टीव्हीवर केलेला पाहायला मिळाला... 


आमिन हाफिझ असं या पाकिस्तानी पत्रकाराचं नाव आहे. लाहोरमध्ये वर्दळाच्या रस्त्यावरून जाताना म्हशी कशा शेजारच्या एका पुलाची मदत घेत आहेत... हे त्याला आपल्या रिपोर्टमधून सांगायचं होतं.