लंडन : जर तुम्हाला बाग सुंदर करण्याचा आणि काळजी घेण्याचा अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. कारण ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना राजमहलातील बगीच्यासाठी एक माळीची गरज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राजमहालाचा बगीचा अतिशय सुंदर आहे. या बगीच्याच सौंदर्य कायम राखण्यासाठी एलिझाबेथ यांना तज्ज्ञ व्यक्तीची गरज आहे. हो आणि यासाठी पगारही  तेवढाच दिला जाणार आहे.


या व्यक्तीचा पगार १६ हजार ५०० पाऊंडस असणार आहे, म्हणजेच वार्षिक पगार १५ लाख रूपये, हा एक फुलटाईम जॉब असणार आहे. कर्मचाऱ्याची राहण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे.


रॉयल हाउसहोल्डने आपल्या वेबसाईटवर लिहिलं आहे, "पॅलेससाठी एका निष्णात माळीची गरज आहे, माळींच्या या छोट्याशा बागेत सहभागी व्हा, आणि राजेशाही बगीचे आणि सेंट जेम्स पॅलेसच्या आसपासचा भाज सजवण्यासाठी मदत करा."


बाग अधिक सुंदर करण्याची जबाबदारी देखील तुमची असणार आहे, या व्हॅकन्सीसाठी उमेदवाराकडे यूकेचं ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे. कर्मचाऱ्याला वर्षात ३३ सुट्या असतील, याशिवाय पेन्शन स्कीम, खाणे, ट्रेनिंगसारखी सुविधा असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे.