सिडनी : ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा पाहायला मिळणार आहे. जगभरात टायटॅनिक जहाजाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, हे जहाज १०६ वर्षांपूर्वीच बुडाले, त्याची कथा मांडणारा ‘टायटॅनिक‘ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायटॅनिक बुडाले असले तरी त्याची प्रतिकृती दोन वर्षांत तयार होणार आहे. टायटॅनिक उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले तेव्हा दीड हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. 


टायटॅनिक या अभूतपूर्व जहाजाची प्रतिकृती रॉयल मरीन सर्व्हिसेस ‘टायटॅनिक-२’ या नावाने २०१८ मध्ये प्रत्यक्षात येणार असून, हे जहाज सेवेतही दाखल करण्यात येणार आहे. 


टायटॅनिक-२ या जहाजाची कल्पना ऑस्ट्रेलियन उद्योजक क्लाईव्ह पामर यांच्या ब्लू स्टार कंपनीने मांडली आहे. नव्या आवृत्तीची ठेवण १९१२ मध्ये तयार झालेल्या मूळ टायटॅनिकप्रमाणेच असेल, परंतु नवी आवृत्ती चार मीटर रुंद असेल.


टायटॅनिकच्या सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेऊन दोन वर्षांत हे परिपूर्ण जहाज बनविण्यात येणार आहे. मूळच्या टायटॅनिकपेक्षा ही प्रतिकृती चार मीटरने अधिक रुंद करण्यात येणार आहे.