चचीयांग : चीन मधील चचीयांग राज्यातील सुमारे ९० ऐतिहासीक खेडी पर्यटनासाठी विकसित करण्यात येत आहेत. या गावांमध्ये होम स्टे प्रकल्प उभारण्यात येत असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जिन्हुआ महानगरपालिकेने हा  प्रकल्प हाती घेतला असून सुओयुआन आणि सफिंग  गावं कृषी किंवा ग्रामीण पर्यटनासाठी विकसित करण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या प्रचार आणि  प्रसारासाठी ५० परदेशी  विद्यार्थी आणि पर्यटकांना आमंत्रित केलं जातं. 


विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च चीन सरकारतर्फे केला जातो. या दरम्यान चीनी संस्कृती, चीनी खाद्य संस्कृती  आणि चीनी ग्रामीण व्यवस्था, पारंपरिक चीनी औषधं, चीनी युद्धकला म्हणजेच मार्शल आर्ट्स याची माहिती दिली जाते. त्याच बरोबर काही  पर्यटन स्थळही दाखवली जातात. 


यामध्ये चीन मधील सगळ्यात मोठी   बाजारपेठ यीवू आणि डबल ड्रागन केव्स यांचा समावेश आहे. 


चचीयांग प्रांतातातील पुढील प्रकल्प युयुआन आणि चयान गावांत राबवण्यात येत  आहे. पुढील होम स्टे प्रकल्पासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी


http://www.jinhua-homestay.com या संकेतस्थळाला भेट द्या .