वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. अशातच संपूर्ण जगात याच गोष्टीची चर्चा आहे की अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यत्र कोण होणार ? हिलेरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रंप ? राष्ट्राध्यक्षपदाच्या या शर्यतीत डेमोक्रेटीक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रंप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याशिवाय लिबर्टी पक्षाचे गॅरी जॉनसन हे देखील या शर्यतीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील या सर्वोच्च पदाच्या निर्णय एक निवडणूक मंडळ घेतं ज्यामध्ये ५३८ सदस्य आहेत. हे सदस्य अमेरिकेच्या ५० राज्यांमधून निवडून येतात. राष्‍ट्राध्यक्ष बनण्यासाठी २७१ सदस्यांचं समर्थन गरजेचं असतं. ज्या प्रकारे भारतात खासदार लोकसभेत निवडून जातात आणि ज्यांचे जास्त खासदार त्यांचा पक्षाचा पंतप्रधान त्याच प्रकारे अमेरिकेच्या ५० राज्यांमधून हे सदस्य निवडले जातात आणि ते राष्ट्राध्यक्ष निवडतात.


अमेरिकेत जेव्हा मतदार मतदान करतात तेव्हा ते या गोष्टीचा निर्णय घेतात की त्यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत दोन मोठ्या पक्षातील कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. मग त्या पक्षाच्या सदस्याला ते निवडून देतात जे पुढे जाऊन राष्ट्रध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडून देणार आहेत. ज्या पक्षाला सर्वाधिक मतं मिळतात तो पक्ष त्या निवडणूक मंडळात त्यांचे सदस्य पाठवतो. 


एक महिन्यानंतर डिसेंबरमध्ये या निवडणूक मंडळाचे सदस्य आपल्या आपल्या राज्यात एकत्र येतात आणि राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवारासाठी मतदान करतात. जानेवारी महिन्यात मग मतमोजणी होते. त्यानंतर नव्या राष्ट्राध्यक्षाचं नाव जाहीर होतं. यंदा ६ जानेवारी २०१७ या दिवशी अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षाची घोषणा होणार आहे. २० जानेवारी २०१७ ला अमेरिकेचे हे नवे राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाउसमध्ये जाऊन मग त्यांचा कार्यभार सांभाळतील.