वॉशिंग्टन : हैतीमधल्या भयावह परिस्थितीमुळं अमेरिकेनं जोरदार धसका घेतलाय. कारण मॅथ्यू चक्रीवादळ आता अमेरिकेच्या दिशेनं सरकू लागलं आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासात हे वादळ महासत्ता अमेरिकेत धडकण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वादळाची भीषणता पाहता अमेरिकेनं सर्व तयारी केली आहे. चार राज्यांमधून जवळपास 30 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. हे वादळ अमेरिकेसाठी चिंतेचा विषय असल्याचं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही म्हटलं आहे.


हैती देशाला मॅथ्यू चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसलाय.  यातल्या बळींची संख्या आता 842 च्या वर गेलीय. हजारो लोक या वादळामुळे बेघर झालेत.