`मारून तर बघ...` कट्टरतावादी पुरुषांना महिलांची चपराक
पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय.
कराची : पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय.
पत्नीला मारहाण करण्याची मुभा...
या विधेयकानुसार, आपल्या पत्नींना काही प्रमाणात मारहाण करण्याची मुभा पतींना देण्यात यावी, अशी अजब आणि तितकीच धक्कादायक शिफारस घटनात्मक संस्थेकडून करण्यात आलीय.
पतीचं म्हणणं डावलल्यास, पतीनं सांगितल्याप्रमाणे पेहराव न केल्यास, पतींच्या लैंगिक इच्छा पूर्ण न केल्यास आणि आणखीन अशा काही गुन्ह्यांसाठी पत्नींना मारहाण करण्याची मुभा पतींना असावी, असं यात म्हटलं गेलंय.
'मारुन तर बघ...'
यावर, फहाद राजपेर नावाच्या एका फोटोग्रारनं पाकिस्तानी स्त्रियांचे पोट्रेट शेअर करत याविरुद्ध पहिल्यांदा आवाज उचलला. सोशल मीडियावर #TryBeatingMeLightly (मारुन तर बघ...) असा हॅशटॅग वापरत राजपेर आणि पाकिस्तानातील आणखीन काही महिलांनी या विधेयकाचा धिक्कार केलाय.