नवी दिल्ली : आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि जगातील इतर देशांचं त्यांच्या उत्पन्नाच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आलंय. आता भारताला 'लोअर मीडल इन्कम' असणाऱ्या देशांसोबत सामील करण्यात आलंय. 


पाकिस्तान आणि चीनचं काय?


भारतासोबतच पाकिस्तानचाही 'लोअर मीडल इन्कम' श्रेणीत समावेश करण्यात आलाय. 


पण, भारताचा दुसरा देश चीन मात्र 'अपर मीडल इन्कम' देशांच्या श्रेणीत सहभागी झालाय. चीनसोबतच या श्रेणीत मॅक्सिको, ब्राझील या दशांचाही समावेश आहे. 


नव्या अर्थव्यवस्थेचं गणित 


नव्या वर्गीकरणानुसार, ज्या देशांचं ग्रॉस नॅशनल इन्कम (प्रति व्यक्ती) १०४५ डॉलरपेक्षा कमी आहे त्यांना 'लो इन्कम देश' (कमी उत्पन्न गट) किंवा अर्थव्यवस्था म्हटलं जाईल. तर ज्या देशांची मिळकत १०४६ डॉलरपासून ४१२५ डॉलर पर्यंत आहे त्यांना 'लोअर मीडल इन्कम' देश म्हटलं जाईल.