नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये फाशी सुनाविलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकासंदर्भात चर्चा करण्यासाठी भारताचे पाकिस्तानमधील राजदूत गौतम बंबावले हे पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुआ यांची भेट घेणार आहेत. जाधव यांच्याशी संपर्क करण्यासंदर्भातील भारताची विनंती पाकिस्तानकडून १३ वेळा फेटाळण्यात आली.


जाधव यांना कायदेशीर मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्नही भारताकडून करण्यात येणार आहे. जाधव यांची काहीही माहिती नसल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.