ढाका : ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतीय तारिषी जैन हिचा मृत्यू झाला आहे. मूळचं उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादचं असणारं तारिषीचं कुटुंब आता ढाक्यात राहतं. 19 वर्षीय तारिषी कॅलिफोर्नियाच्या बर्कले इथं शिकत होती. ज्यावेळी दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी तारिषी आपल्या ढाक्यातल्या घरी आली होती. त्याचवेळी दहशतवाद्यांची गोळी तारिषीला लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढाक्यात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांमध्ये तारिषीचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या प्रत्येकाला आयत म्हणण्यास सांगत होते. ज्या व्यक्तीनं आयत म्हटलं दहशतवाद्यांनी त्यांची सुटका केली. ज्यांना ते जमलं नाही त्यांची या दहशतवाद्यांनी क्रूरपणे हत्या केली.


तारिषीच्या मृत्यूची बातमी हल्ल्याच्या तब्बल बारा तासानंतर समजली. पररराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन तारिषीच्या मृत्यूची माहिती दिली.