व्हिडिओ वायरल : भारत-पाक सीमेवर जवानांमध्ये हाणामारी!
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला बॉर्डरवर रिट्रीट सेरेमनीदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या दोन जवानांमध्ये चांगलीच हाणामारी रंगली.
नवी दिल्ली : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला बॉर्डरवर रिट्रीट सेरेमनीदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या दोन जवानांमध्ये चांगलीच हाणामारी रंगली.
रिट्रीट सेरेमनी दरम्यान भारत - पाक जवान एकमेकांना धडकले... आणि त्यामुळे दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.
हा प्रकार पाहून इतर जवान धावले... आणि त्यांनी या दोघांनाही बाजुला केलं. हा व्हिडिओ ९ जून रोजी चित्रीत करण्यात आलाय... सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालतोय़.