फोटो : या महिलेच्या पोटात वाढतोय `गॉड जिझस`!
अमेरिकेतील इंडियाना शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटात जीझस (प्रभू येशू) वाढत असल्याचा दावा केला जातोय.
न्यूयॉर्क : अमेरिकेतील इंडियाना शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटात जीझस (प्रभू येशू) वाढत असल्याचा दावा केला जातोय.
या गर्भवती महिलेचा अल्ट्रासाऊंट तंत्रज्ञान पद्धतीनं एका फोटो घेतला गेलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. येत्या जून महिन्यात या बाळाचा जन्म होण्याची शक्यता आहे.
इंडियानात राहणाऱ्या ऐले मेयर या महिलेचा अल्ट्रासाऊंड टेक्नीकनं घेतल्या गेलेल्या फोटोमध्ये एक क्रॉस दिसून येतोय. त्यामुळे तिच्या पोटात जिझस वाढतोय, असा समज होतोय.
एका मैत्रिणीनं लक्षात आणून दिल्यानंतर ऐलेनं हा फोटो सोशल मीडिया फेसबुकवर अपलोड केला. हा फोटो झूम केल्यानंतर जीझसचे पाय आणि केसही दिसतात, असाही दावा केला जातोय.