विवाहीत महिलांमुळेच वाढतोय भ्रष्टाचार; मंत्रिमहोदयांचा जावईशोध
इंडोनेशियाच्या एका मंत्र्यांनं भ्रष्टाचारासंबंधी एक अजब वक्तव्य केलंय. त्यांनी भ्रष्टाचारासाठी सरळ सरळ विवाहीत महिलांनाच जबाबदार धरलंय.
नवी दिल्ली : इंडोनेशियाच्या एका मंत्र्यांनं भ्रष्टाचारासंबंधी एक अजब वक्तव्य केलंय. त्यांनी भ्रष्टाचारासाठी सरळ सरळ विवाहीत महिलांनाच जबाबदार धरलंय.
'महिलांचे चोचले...'
इंडोनेशियाचे धार्मिक मुद्यांचे मंत्री लुकमान हकीम सैफुद्दीन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'पत्नींच्या अनेक इच्छा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरुष भ्रष्टाचार करतात' असं त्यांनी म्हटलंय. महिलांना डिझायनर कपडे, दागिने हवे असतात, आणि हेच भ्रष्टाचाराचं मूळ कारण असल्याचा जावईशोध या मंत्री महोदयांनी काढलाय.
महिलांना सल्ला...
सोबतच, महिलांनी महागड्या गोष्टींची मागणी करू नये, त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.
यावरून महिलांनी मंत्र्यांना चांगलंच धारेवर धरलंय. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महिलांना जबाबदार ठरवणं, अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे, भ्रष्टाचाराच्या कारणावरून इंडोनेशियाच्या अनेक मंत्र्यांना इतकच काय तर न्यायाधिशांनाही लाच घेण्याच्या आरोपावरून तुरुंगवास भोगावा लागलाय. भ्रष्टाचाराच्या बाबतीत इंडोनेशिया १६८ देशांच्या लिस्टमध्ये ८८ व्या क्रमांकावर आहे.