मोसूल, इराक : आयसिस ही जगातली आजवरीच सर्वात जहाल संघटना आहे यात दुमत नाही. इराक आणि सीरियाचा बराचसा भाग आपल्या अमलाखाली घेतलेल्या या संघटनेनं अनेक देशांमध्ये उच्छाद मांडलाय. मात्र या अतिरेकी संघटनेचे हात किती वरपर्यंत पोहोचलेत हे दाखवणारा आयसिसचा मृत्यूचा कारखाना उजेडात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- 'आयसिस'नं उघडला होता मृत्यूचा कारखाना
- इराकमध्ये सापडली 'आयसिस'ची बॉम्ब फॅक्टरी
- आतापर्यंतचा सर्वात मोठा कारखाना उजेडात


मोसूल हा आयसिस या जहाल अतिरेकी संघटनेचा इराकमध्ये उरलेला शेवटचा तळ. हा तळ उध्वस्त करण्यासाठी इराकी फौजांनी धडक कारवाई सुरू केलीये. यात शहराचा एकेक भाग आयसिसच्या जोखडातून मुक्त केला जात आहे. अशाच एका मुक्त केलेल्या भागात सैनिकांना एक गोदाम आढळले.


सैनिकांनी गोदामात प्रवेश केल्यावर मात्र त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. या गोदामात चक्क बॉम्ब आणि इतर हत्यारं तयार करणारा भलामोठा कारखानाच सापडला आहे. यापूर्वीही सैन्याला असे काही कारखाने सापडले होते. मात्र इतका मोठा कधीच नव्हता.


आम्ही खूप युद्ध लढलोय आणि फालूजानमध्ये असे काही बॉम्बचे कारखानेही बघितलेत. मात्र हा आतापर्यंत आढळलेला सर्वात मोठा कारखाना आहे. इथं तुम्हाला आयसिसच्या 11 शेल्स दिसतायेत. याचाच आधार घेऊन कारखान्यात बॉम्ब बनवले जात होते, अशी माहिती ज्यांना मिळाली त्या अधिकाऱ्यांनी सांगितली. 



या गोदामाच्या वेगवेगळ्या भागात इराकी फौजांना बॉम्ब तयार करण्याची असेम्ली लाईनच आढळली. अतिरेकी संघटनांकडे असलेली हत्यारे ही एखाद्या देशाने पुरवलेली किंवा तस्करीच्या मार्गातून मिळवलेली असतात, हा सर्वसाधारण समज या कारखान्याने खोटा ठरवला आहे. इराक आणि सीरियामध्ये आयसिसच्या ताब्यात असलेल्या भागात असे आणखी किती कारखाने असतील याची चर्चा सुरु झालेय.