`बस ड्रायव्हर`चा मुलगा झाला लंडनचा महापौर
लंडन : सादिक खान यांची आज लंडनच्या महापौरपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली. यानिमित्ताने लंडन शहराचा महापौर होण्याचा मान प्रथमच एखाद्या मुस्लिम नागरिकाला मिळाला आहे.
कामगार पक्षाचे नेते सादिक खान लंडनमधील महापौर पदाची निवडणूक जिंकलेत. ते लंडनमधील पहिले मुस्लिम महापौर झाले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले, सादिक खान ने आपल्या प्रतिस्पर्धी कंजर्वेटिव पार्टीचे जॅक गोल्डस्मिथला ३ लाखापेक्षा जास्त मतांनी हरवले आहे.
हे मतदानाच्या २४ तासानंतर समजले. सादिक खान स्वत:ला अतिरेक्यांविरुद्ध लढणारा ब्रिटीश मुस्लिम समजतात.
या दोघांनी एकमेकांवर कोणते आरोप केले
- गोल्डस्मिथ हा बहुसांस्कृतिक शहरांमधील मतदारांमध्ये भीतीचं आणि तणावाचं राजकारण करत आहेत, त्यामध्ये काही मतदार १ दशलक्ष पेक्षा जास्त मुस्लिम बांधव आहेत.
- तसेच सादिक खानवर गोल्डस्मिथने निवडणूक प्रचारादरम्यान असा आरोप केला की, सादिक खान अतिरेकी असून तो अतिरेक्यांचा साथीदार आहे. त्यांच्या या आरोपादरम्यान मतदारांनी भरपूर टीका केली. एवढचं नाही तर गोल्डस्मिथच्या कंजर्वेटिव पार्टीने देखील टीका केली.
सादिक खान कोण आहे?
सादिक खान हा सामान्य घरातील मुलगा आहे. तसेच त्यांचे वडील लंडनमध्ये एक बस ड्रायव्हर असून आई शिंपी आहे.
वयाच्या ४५ व्या वर्षी सादिक खानचा सामना कंजर्वेटिव पार्टीचे जॅक गोल्डस्मिथ यांच्यासोबत झाला आहे. तसेच गोल्डस्मिथ एका श्रीमंत व्यापाराचा मुलगा आहे.
सादिक खान आता करिष्माई बोरिस जॉन्सन या नेत्याची जागा घेणार आहे.