डब्लिन : आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिओ वराडकर यांचा जन्म डब्लिनमध्ये झाला. त्यांची आई आयरिश आहे. सध्या लिओ आयर्लंडच्या मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्री आहेत. पंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता सत्ताधारी फाईन गिल पक्षामध्ये पंतप्रधानपदाची शर्यत सुरू झालीये. यामध्ये वराडकरांचं नाव आघाडीवर आहे.


वराडकर यांच्यासमोर गृहनिर्माण मंत्री सिमोन कोवेनी यांचं आव्हान आहे. मात्र वराडकरांना पाठिंबा वाढत असून त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं जातंय. लिओ वराडकर हे आयर्लंडचे पहिले समलिंगी मंत्री आहेत. त्यांनी समलिंगी विवाहाच्या अधिकारासाठी त्या देशामध्ये यशस्वी लढा दिलाय.