जकार्ता : इंडोनेशियामधेय हनुमानानं एका मुलाच्या रुपात अवतार घेतलाय, अशी चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद रेहान असं या १३ वर्षीय या मुलाचं नाव आहे. रेहान हा 'वेयरवुल्फ' नावाच्या अनुवांशिक आजारानं त्रस्त आहे. या आजारामुळे त्याच्या संपूर्ण शरीरावर तीन इंचांहून लांब केस आहेत. पण, हा आजार नसून हनुमानानंच पृथ्वीवर जन्म घेतल्याची काही अंधश्रद्धाळू भाविकांची श्रद्धा आहे. 


वेयरवुल्फ आजाराविषयी 


वेअरवुल्फ हा आजार लाखांपैंकी एकाला होतो. जिन्समध्ये बदल झाल्यामुळे हा आजार उद्भवतो. विज्ञानाच्या या आजारावर इलाजही उपलब्ध आहे.


उपचारास नकार... 


परंतु, आपल्याला काहीतरी आजार आहे आणि त्यावर उपचार करायला हवाय, असं मानण्यास १३ वर्षीय रेहाननं नकार दिलाय. इंडोनेशियाच्या कालीमंतन भागातील ममबुरुंग गावात तो आई आणि चार बहिणींसोबत राहतो.  


ईश्वराचा अवतार


उल्लेखनीय म्हणजे, रेहानही स्वत:ला ईश्वराचा अवतार समजतोय. त्यामुळेच आपल्याला इलाजाची गरज नाही, असा समज त्यानं करून घेतलाय. अनेक लोक त्याचे आशिर्वाद घेण्यासाठीही येतता. यातच तो खुश आहे. 


वडिलांनाही होता हाच आजार... 


रेहानच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांचा १० महिन्यांपूर्वी मृत्यू झाला त्यांच्याही शरीरावर रेहानसारखेच खूप केस होते. परंतु, त्यांना काहीही त्रास झाला नाही. रेहान इतर मुलांसारखा नाही कारण हीदेखील ईश्वराची मर्जी आहे.