दुबई :  जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एका भारतीय व्यक्तीनं तब्बल 22 फ्लॅट्स घेतलेत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ही बुर्ज खलिफा आहे... इथं तू जाऊच शकत नाहीस', असं एका नातलगानं गमतीनं चिडवलं... केरळमध्ये जन्मलेला आणि शाजरातले अत्यंत यशस्वी व्यावसायिक असलेल्या जॉर्ज नेरेपरांबली यांनी चंगच बांधला... 


एकामागून एक फ्लॅट्स ते घेत गेले आणि आता बहुदा 828 मीटर उंचीच्या बुर्ज खलिफामध्ये त्यांच्याकडेच सर्वाधिक फ्लॅट्स आहेत... 


अर्थात, ते एवढ्यातच समाधानी नाहीत... चांगला व्यवहार झाला तर आणखीही फ्लॅट्स खरेदी करण्याचा त्यांचा मानस आहे... 


ते १९६७ साली शारजात गेले आणि तिथं स्वतःचा व्यवसाय सुरू केला... त्याचं रुपांतर आता जीईओ नावाच्या साम्राज्यात झालंय... 
 


मॅकेनिक ते जगातील सर्वांत उंच इमारत 'बुर्ज खलिफा'मधील २२ फ्लॅटचे मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. 'बुर्ज खलिफा'मधील एकूण ९०० पैकी २२ फ्लॅट जॉर्ज यांचे आहेत.
  
वयाच्या अकराव्या वर्षापासून वडिलांसोबत शेतमालाचा व्यापार करण्यासाठी जाणाऱ्या जॉर्ज यांना व्यावसायिक बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मॅकेनिक म्हणून दुबई गाठली. दुबईसारख्या देशात 'एसी'चा उद्योग चांगला चालेल हे जॉर्ज यांनी ७०च्या दशकातच हेरले. १९७६ ला त्यांनी शारजा शहरात 'जीईओ' ही 'एसी'ची कंपनी सुरू केली आहे. मॅकेनिक ते एका कंपनीसह बुर्ज खलिफातील २२ फ्लॅटचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणाराच आहे.