कोलंबिया : व्हाईट हाऊस म्हणजे जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्रपतींचं निवासस्थान. हेच निवासस्थान १९९८ मध्ये इतकं चर्चेत आलं की जसं अमेरिकाच्या राजकारणात वादळच आलं होतं. एक इनटर्न म्हणून काम करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचं आणि राष्ट्रपतींचं सेक्स स्कँडल जेव्हा उघडकीस आलं तेव्हा अमेरिकेत हे एका वादळा सारखंच होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनिका लेविंस्कीने १९९५ ते १९९७ या दरम्यान तिच्यात आणि तत्कालीन राष्ट्रपती क्लिंटन यांच्यामध्ये ९ वेळा सेक्स संबंध झाल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा राष्ट्रपती क्लिंटन यांनी तिचा फायदा उचलल्याचं मोनिका हिने म्हटलं होतं.


अगोदर तर क्लिंटन यांनी ही गोष्ट फेटाळली पण नंतर त्यांनी ही गोष्ट कबूल केली. या सेक्स स्कँडलनंतर मोनिकाने व्हाईट हाऊस सोडलं होतं. त्यानंतर काही काळ ती लंडन येथे राहिली. तिच्या या खुलास्यामुळे अमेरिकेत तिला नोकरी मिळणे कठिण झाले होते.


वर्ष 2000 पर्यंत क्लिंटन हे देशाचे राष्ट्रपती राहिले. विरोधकांनी त्यांना पदावरून खाली खेचण्याचा खूप प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले होते.