मुंबई : व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात मात्र प्रेम व्यक्त करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी गिफ्ट देणाऱ्यांचं प्रमाण भारतात देखील मोठं आहे. अमेरिकेत आता गिफ्टवर जास्त खर्च केला जात नाही. ही माहिती एका वेबसाईटने केलेल्या सर्वेमधून समोर आली आहे.


वेबसाईटने भारतात केलेल्या सर्वेनुसार यंदा गिफ्ट देणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे. या सात दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठांमध्ये व्यवहारांची रेलचेल पाहायला मिळाली. लोकांनी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरेदी केली. 


वेबसाईटच्या मते महिलांपेक्षा पुरूष जास्त खर्च करतात. जॉब करणाऱ्या लोकांनी १ हजार पासून ५० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. तर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांनी ५०० पासून ते १० हजार रूपये खर्च केले. 


मागच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी बाजारात १२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली तर या वर्षी जवळपास १५ हजार कोटींची उलाढाल होणार असल्याची शक्यता आहे.