ओक्लाहोमा / अमेरिका : आईनंच आपल्या मुलीशी विवाह केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? पण, असं घडलंय खरं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च 2016 मध्ये पेट्रीसिया स्पॅन नावाच्या 43 वर्षीय महिलेनं आपल्या 23 वर्षांच्या मिस्टी स्पॅन या मुलीसोबत विवाह केलाय. हा विवाह कोमांचे काऊंटीमध्ये पार पडला. 


पेट्रीसिया हिला मिस्टीसह तीन मुलं आहेत. मानव सेवा विभागानं ऑगस्ट महिन्यात आई-मुलीच्या या जगावेगळ्या संबंधांची चौकशी केली.


आपण आपल्या मुलीसोबत विवाह करून कोणत्याही प्रकारचा कायदा मोडलेला नाही, असं पेट्रीसिया हीचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रीसिया हीनं 2008 मध्ये आपल्या मुलासोबतही विवाह केला होता. 


पेट्रीसिया आणि मिस्टी यांना दोघांनाही अटक करण्यात आलीय. दोघीही स्टिफंस काऊंटी जेलमध्ये आहेत. या दोघींना जामिनासाठी 10,000 डॉलर भरावे लागणार आहे. दोषी आढळल्यास दोघींना 10 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली जाऊ शकते. 


ओक्लाहामामध्ये आपल्या अगदी जवळच्या नात्यात विवाह करणं, हे बेकायदेशीर आहे. ओक्लाहोमा संयुक्त राष्ट्र अमेरिका एक राज्य आहे.