नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस मुन्ना झिंगडाची कस्टडी घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम थायलंडला गेली आहे. झिंगडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिंगडाची कस्टडी पाकिस्तानला हवी आहे. पाकिस्तान दावा करतो की तो पाकिसतानचा नागरिक आहे. पण तो भारताचा नागरिक असल्याचा भारताचा दावा आहे. झिंगडा हा भारताच्या हाती लागू नये म्हणून पाकिस्तानचा प्रयत्न आहे कारण तो भारताच्या हाती लागल्याने अनेक गोष्टींची पोलखोल करु शकतो. दाऊद बाबत तो काही पुरावे भारताला देऊ शकतो याची भीती पाकिस्तानला आहे.


झिंगाडाने छोटा राजनवर बँकॉकमध्ये फायरिंग केली होती. झिंगाडा मुंबईमधील जोगेश्वरीचा राहणारा आहे. अबु इस्माईल कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतलं आहे. दाऊद आणि छोटा शकीलचा हा खास माणूस आहे. छोटा राजन आणि कुमार पिल्लई यांना देखील याआधी भारतात आणलं गेलं आहे.