इस्लामाबाद : पाकिस्तानने म्हटले आहे,   पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये आम्ही काश्‍मीरचा मुद्दा पूर्ण ताकदीने लावून धरू, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानविषयी उघडपणे बोलून धोक्‍याची रेषा ओलांडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी म्हटलंय, 'आमसभेमध्ये मागील वर्षी आमच्या पंतप्रधानांनी  हा मुद्दा मांडला होता, पुन्हा आम्ही तेवढ्या ताकदीने त्यावर भांडणार आहोत.'


पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. 


कराची आणि बलुचिस्तानातील अनेक कारवायांमध्ये भारताचा हात आहे, काश्‍मीरमधील मानवी हक्काच्या उल्लंघनाचा मुद्दा दडपण्यासाठी भारताने जाणीवपूर्वक हा मुद्दा उपस्थित केल्याची बडबड त्यांनी केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.