नवाज शरीफ मोदींचे गुलाम, पाक सोशल मीडियात व्हायरल
LOCमध्ये घुसून भारतीय सैन्याने कारवाई करत पाकिस्तान पुरस्कृत दशवादी तळांवर हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तांनी चहुबाजूने कोंडी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाक सोशल मीडियात त्यांना मोदींचे गुलाम म्हटले आहे.
इस्लामाबाद : LOCमध्ये घुसून भारतीय सैन्याने कारवाई करत पाकिस्तान पुरस्कृत दशवादी तळांवर हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तांनी चहुबाजूने कोंडी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाक सोशल मीडियात त्यांना मोदींचे गुलाम म्हटले आहे.
सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी नेटिझन्सनी नवाज शरीफ यांची खिल्ली उडवली आहे. ट्विटरवर #NawazModiKaGhulam हा हॅशटॅग वापरून शरीफ यांच्यावर राग व्यक्त केला. पाकिस्तानमध्ये आज टॉपमध्ये #NawazModiKaGhulam असा ट्रेण्ड पाहायला मिळाला.
तर काहींनी मोदी-शरीफ यांच्या भेटीचे छायाचित्र अपलोड केले आहे. याबरोबरच कार्टूनही दिसत होते. नवाज हे मोदींचे गुलाम आहेत, असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
इंडिया की गली-गली मे आम है, नवाज हमारा गुलाम है, असे ट्विट PTI-VF TIGRESs @politicalTigres ने केले आहे. पाकिस्तान इंडियाचे गुलाम असल्याचे Attia_Kiran @attia_kiran ने म्हटले आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काल पाकिस्तानमध्ये टॉप ट्रेन्डमध्ये होते. केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करण्याची मागणी केली होती. पाकमधील ट्विटर युजर्सनी ही मागणी उचलून धरत #PakStandsWithKejriwal असा ट्रेन्ड होता. आज #NawazModiKaGhulam असा ट्रेण्ड पाहायला मिळाला.