वॉशिंग्टन : पृथ्वीपासून 340 प्रकाशवर्षे दूर एका नव्या ग्रहाचा शोध लागला आहे. या ग्रहाला एचडी 131399 एबी असे नाव देण्यात आले आहे. हा ग्रह गुरू ग्रहापेक्षा चारपट जास्त वजनदार आहे. तसेच हा तीन ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालतो. यामुळे येथे दिवसातून तीनवेळा सूर्यास्त आणि सुर्योदय होतो.


संशोधकांच्या म्हणण्यानुसार एचडी 131399 एबी हा ग्रह 1.6 करोड वर्षे जुना आहे. सायन्स या मासिकात या संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले आहे.