दुबई : ताज महलची प्रतिकृती दुबईमध्ये तयार करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी दुबईमधल्या लेगो लँडमध्ये ताजमहालची प्रतिकृती उभारण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील प्रसिद्ध आणि जागतिक वारशाचा दर्जा लाभलेल्या अनेक वास्तूंच्या प्रतिकृती पाहायला मिळतात.  लेगो लँडमध्ये या थिम पार्कमध्ये पाहायला मिळतात.


थिम पार्क पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. कारण एका छताखाली जगभरातील आश्चर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत असते, जगभरात डेन्मार्क, फ्लोरिडा, मलेशिया, कॅलिफोर्निया, जर्मनी अशा अनेक ठिकाणी हे थिम पार्क आहे.


भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनादिवशी ताज महालची ही प्रतिकृती लेगोलँडने जगासमोर आणली. जवळपास साडेसहाशे किलो वजनाची ही प्रतिकृती आहे, आणि ६० लाखांहून अधिक विटांचा वापर करून लेगो कंपनीने ही ताजमहालची प्रतिकृती बनवली आहे. 


मात्र ही प्रतिकृती प्रत्यक्षात जाऊन पाहण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे, कारण ऑक्टोबर महिन्यात हे थिम पार्क खुले करण्यात येणार आहे.


जवळपास दोन हजार तासांहूनही अधिक काळ ही प्रतिकृती बनवण्यासाठी लागला.