पेईचिंग : इंटरनेटवरून लोन देताना न्यूड फोटो मागण्याचे धक्कादायक प्रकार चीनमध्ये समोर आले आहेत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना लोनची आवश्यकता असेल तर त्यांच्याकडून तारण म्हणून या न्यूड फोटोची मागणी केली जायची. कर्ज फेडलं नाही तर हे न्यूड फोटो व्हायरल करायची धमकी दिली जायची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोन फॉर पॉर्नचं या स्कीमचं हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवरून या स्कीमवर जोरदार टीका होत आहे. काही मुलींनी त्यांचे न्यूड फोटो पाठवून कर्जही घेतलं आहे. 


जिदाईबाओसारखी कर्जाची ही स्कीम असल्याचं चीनच्या मीडियातून समोर येत आहे. जिदाईबाओ एक असा प्लॅटफॉर्म आहे जिकडे कोणीही कर्ज घेऊ अथावा देऊ शकतो. कर्ज देताना दोन्ही व्यक्ती अटी ठरवतात आणि हे कर्ज दिलं जातं. कर्ज देणारे बहुतेकवेळा तरुणांना टार्गेट करतात कारण विद्यार्थ्यांना कर्जाच्या अटींबाबत जास्त माहिती नसते.